आजचा Pu La Deshpande Quotes In Marathi लेख पूर्णपणे पीएल देशपांडे यांना समर्पित आहे. प्रसिद्ध मराठी लेखक पु.ल.देशपांडे यांचे पूर्ण नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे होते. ते एक अभिनेता, पटकथा लेखक, संगीतकार, चित्रपट दिग्दर्शक आणि वक्ता देखील होते.
त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्वही म्हटले जायचे. देशपांडे यांचे साहित्य इंग्रजी आणि कन्नडसह अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे.
पु. ल. देशपांडे यांचे विचार | Pu La Deshpande Quotes In Marathi
1.
जाळायला काहीचं नसलं की पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते.
2.
जुन्यात आपण रंगतो… स्मृतीची पाने उलटायला बोटांना डोळ्यातलं पाणी लागते. मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दु:खाच्या!.
3.
जगा इतके की आयुष्य कमी पडेल. हसा इतके की आनंद कमी पडेल.
4.
शेवटी काय हो, आपण पत्त्याच्या नावाचे धनी, मजकुराचा मालक निराळाच..
5.
समाजात बेअक्कल म्हणून मानली गेलेली कामे करायला कोणी येतं नाही. फुकट तर नाहीच नाही आणि ती उपयुक्त पण बेअक्कल कामे करणाऱ्यांना आपण हीन मानतो हे तर साऱ्या सामाजिक अनास्थेचे मूळ कारण आहे.
6.
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भाग पडेल.
7.
माणूस निरुत्तर झाला तरी हरकत नाही पण निष्प्रश्न झाला की संपलाच.
8.
जगात काय बोलत आहात ह्यापेक्षा कोण बोलत आहात ह्याला जास्त महत्त्व आहे.
9.
कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होशमध्ये असणं यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे.
10.
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
11.
सगळे वार परतवता येतील पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही.
12.
प्रोब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टीपलीकडला प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो.
13.
आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो ही जाणीव फार भयप्रद आहे.
14.
घड्याळाच काय अन् माणसाचं काय, आतलं तोल सांभाळणारं चाक नीट राहिलं की फार पुढे ही जाण्याची भिती नाही आणि फार मागेही पडण्याची नाही.
15.
खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो.
पु. ल. देशपांडे स्टेटस मराठीत | P. L. Deshpande Status In Marathi
1. भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील माणसं दाखवतो.
2. प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे.
3. जुन्यात आपण रंगतो. स्मृतीची पाने उलटायला बोटांना डोळ्यातलं पाणी लागते. मग त्या स्मृती सुखाच्या असोत किंवा दु:खाच्या.
4. ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येते, त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकत घेता येते, त्याला उचलता येत नाही. विचित्र आहे, पण सत्य आहे.
5. लग्नापुर्वी शी न लूक्ड सो … लुकडी!
6. रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही. त्याचा त्रास होतो. पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही, याचा होतो.
7. खरं तर सगळे कागद सारखेच. फक्त त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
8. परिस्थिति हा अश्रूंचा कारखाना आहे!.
9. आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठीआवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
10. क्रियापदाचं मोठेपण त्याच्या कर्त्याने केलेले कर्म किती मोठे याच्यावर अवलंबून असते.
11. शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो. बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.
पु. ल. देशपांडे यांचे सुविचार | Pu La Deshpande Suvichar In Marathi
1. मोठेपणी श्रीमंत हॉटेलात पाय देणाऱ्या मित्रांपेक्षा लहानपणी न मागता हातावर खोबऱ्याची वडी देणारी म्हातारी आठवते.
2. माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे….
3. कुणीसं म्हटलयं – कसा मी ? कसा मी ? कसा मी ? कसा मी ? जसा मी तसा मी असा मी असामी!… खर सांगू का? हे कुणीसं वगैरे म्हटलेलं नाही. मीच म्हटलयं. पण कुणीसं म्हटलयं अस म्हटल्याशिवाय तुम्हीही कान टवकारून काय म्हटलयं ते ऐक्लं नसत. हे असच आहे. जगात काय म्हटलयं यापेक्षा कुणी म्हटलयं यालाच अधिक महत्व आहे हे मला कळून चुकलंय.
4. चोरीमध्ये वाईट काहीच नसतं. तुम्ही काय चोरता याच्यावर ते अवलंबून आहे. तुम्ही जर एखाद्याचं मन चोरलं तर त्यात वाईट काय आहे?
5. जाळायला काही नसलं की पेटलेली काडीसुध्दा आपोआप विझते.
6. रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. पण तुळस वृंदावनातच राहते. तिच्यापुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं.
7. माणसाचे केस गेलेले असले तरी चालतील, पण माणूस हा गेलेली केस नसावा.
8. आयुष्य फार सुंदर आहे… ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे…
9. खरं तर सगळे कागद सारखेच…
त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.
10. मराठीला जी “मज्जासंस्था” वाटते, तीच इंग्रजीला “नर्वस सिस्टम” वाटते. फक्त दृष्टिकोनाचा फरक आहे.
हा Pu La Deshpande Quotes In Marathi लेख पूर्ण वाचल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. पु. ल. देशपांडे यांच्या आश्चर्यकारक विचारांची माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे.
हे पन वाचा: