Motivational Quotes in Marathi: हे युग स्पर्धेचे युग मानले जात आहे. इथे फक्त स्पर्धक होऊन चालणार नाही तर जिंकावे हि लागेल. नाहीतर संपून जाऊ. बहुधा याच विचाराने आपण आपल्या सुंदर आयुष्याला स्पर्धेचे रणांगण बनवून टाकले आहे.
हारण्याच्या भीतीने मानवी जीवन नैराश्याकडे ढकलले जात आहे. व्यस्त जीवनमान, बिघडलेली खाद्यसंस्कृती आणि प्रदूषण हे हि फक्त शारीरिक स्वास्थावर नव्हे तर मानसिक स्वास्थावर भयंकर आघात करत आहेत. माणूस माणसापासून तुटत चाललाय. एखादा बंध तुटल्याने हि तो गर्दीत एकटा पडत चाललाय.
अशी बरीच कारणे आहेत. जिथे मग कोणी नैराश्याच्या, भीतीच्या, लाजेच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत. गरीब शेतकऱ्यापासून अतिश्रीमंत व्यापारी एवढेच काय कि कोवळ्या वयातील मुले हि यातील उदाहरणे आहेत.
मी हि अपवाद नव्हतो. आत्महत्येचा भयंकर विचार मला हि शिवून गेला होता. पण माझ्यात असलेल्या सकारत्मक विचारांनी मला त्या क्षणाला तारले. आज हि जेव्हा आयुष्याकडे पाहतो तेव्हा डोंगराएव्हढी आव्हाने दिसतात. पण तरी आयुष्य फार सुंदर दिसतंय.
इथे हि मी माझ्या विचारांना शब्दात मांडायचा प्रयत्न केलाय. इथे लिहलेल्या 30 Motivational quotes वर मी सहमत आहे. कदाचित हा छोटा प्रयत्न काही अंशी का असेना. तुमच्या किंव्हा तुमच्या जवळच्या व्यक्तीला थोडाफार आधार देईल.
Motivational Quotes in Marathi – मराठी प्रेरणादायक सुविचार
१)
आत्महत्या हा पर्याय असू शकत नाही. तुमच्या निघून जाण्याने एक पर्याय कमी होतो त्यांचा; ज्यांच्यासाठी तुम्ही आधार असता.
२)
सर्वात जास्त स्वतःवर प्रेम करा. म्हणजे आत्महत्येचा विचार शिवणार सुद्धा नाही.
३)
आपण हरलो या विचाराने जो आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतो. तो तेव्हा हरतो; जेव्हा तो आत्महत्या करतो.
४)
मिळालेल्या संधीचे सोने करावे या विचाराने जेव्हा आपल्याला मिळालेली संधी वाया गेले असे वाटते. पण तिथे संधीचा प्रवाह थांबत नाही जिथे प्रयत्नांचा प्रवाह वाहत असतो.
५)
प्रेम तुटलं म्हणून निराश होऊ नका. कारण स्वतःवर प्रेम करायला तुम्ही अजून जिवंत आहात.
६)
गळ्याभोवती मृत्यूचा फास आवळत असताना ज्या वेदना होतील. तेव्हा जाणवेल की त्या वेदने पुढे इतर दुःख क्षुल्लक आहेत. पण तोपर्यंत वेळ झालेला असेल.
७)
जीवनात शत्रू हजार असतील. पण सर्वात मोठा शत्रू तुमचीच नकारात्मकता असेल.
८)
तुम्ही कितीही पुण्यात्मा असला तरी आत्महत्येनंतर समाज तुम्हाला देव नव्हे तर भूत बनवतील.
९)
मातीशी इमान ठेवणाऱ्या शेतकऱ्यांनो लक्षात राहू द्या तुमच्या आत्महत्येनंतर तुमची जमीन बंजर होईल होईल.
१०)
महापुरुषांना वाचत जा. नैराश्य तर दूर राहीलच; यशाचा मार्ग ही सापडेल.
११)
नुकसान कितीही मोठे असले तरी तुमच्या देहापेक्षा मोठे असू शकत नाही.
१२)
कोणतीही गोष्ट एवढिही मनावर घेऊ नका की, मनावरचा ताबा सुटेल.
१३)
कोणी प्रेमाला नकार दिला म्हणून खचू नका. लक्षात ठेवा अजूनही काही नाती आहेत. लक्षात ठेवा अजूनही काही नाती आहेत; जी तुमच्यावर प्रेम करतात.
१४)
नैराश्य आपण आपल्या मर्जीने ओढून घेत नसतो. हो पण मर्जी असेल तर यातून बाहेर पडणे सोपे असू शकते.
१५)
नैराश्य हा एक मानसिक आजार आहे. उपचाराने तो बराही होतो. त्याचा भार घेऊन जगू नका.
१६)
सकारात्मकतेने तुम्ही व्यवसाय चालू केला होता. नुकसानाने नकारात्मक होऊ नका.
१७)
नकारात्मक विचारांनी मार्ग बंद होतात. आणि जिथे सकारात्मकता तिथे मार्ग सापडतात.
१८)
त्रास देणाऱ्या आठवणी आठवत असतील तेव्हा अशा ही आठवणी आठवून पहा ज्यांच्यामुळे चेहऱ्यावर हसू येईल.
१९)
बालपण हे बालिश असू द्या द्या असू द्या द्या. त्याला लगाम घालून स्पर्धेत नका उतरवू.
२०)
प्रेम विरह पचवणं अवघड असतं. अशक्य नाही.
२१)
तीच खरी मैत्री जी नैराश्यात असलेल्या मित्राला वेळेवर दिलासा देते.
२२)
संवाद महत्त्वाचा आहे. गप्प राहिल्याने प्रश्न बनतात. सुटत नाहीत.
२३)
कधीकधी स्वार्थी होऊन पहावे. समाजाचा विचार काय करावा? लाजलज्जेचा फास गळ्याभोवती का म्हणून आवळावा.
२४)
आत्महत्या करायला धाडस लागतं. धाडस दाखवायचा असेल तर असेल तर ते जीवनाच्या युद्धात लढण्यासाठी दाखवा.
२५)
आत्महत्येचा निर्णय घ्याल तेव्हा शेवटचा एकच प्रश्न स्वतःला विचारा. की, ‘मी योग्य करतोय का का?’
२६)
आयुष्य फार सुंदर आहे. फक्त दृष्टिकोन सकारात्मक असू द्या द्या.
२७)
शेकडो उदाहरणे आहेत; ज्यांनी आत्महत्येचा विचार त्यागून जीवनातील सुखी पैलूंची नवनिर्मिती केली.
२८)
योगसाधनेने साधक बना. नैराश्यातून आशेकडे जायची दिशा मिळेल.
२९)
ऐकावे जगाचे करावे मनाचे. कारण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
३०)
निराश का होतो? खडतर मार्गावर तो एकटा नाही आहेस. अजूनही आहे सहप्रवासी इथे. पोहचशील रे गड्या. तु एकटा नाही आहेस.
तर वाचक मित्रांनो कसे वाटले? हा माझा फार छोटा प्रयत्न होता तुमचे जीवनमान प्रकाशित करणाऱ्या दिव्यात थोडे तेल माझ्याकडून. हा लेख तुम्ही तुमच्या मित्रांनाही share करू शकता. आणि तुमचा अभिप्राय नक्कीच कळवा.
धन्यवाद…
Important Posts:
- 30 Love Quotes In Marathi – प्रेमाचे सुविचार
- प्रेरणादायक सुविचार -Love Poems In Marathi – प्रेमावर कविता