Love Quotes in Marathi: ‘प्रेम’ आयुष्यातल्या अभ्यासक्रमातील सर्वात मोठा आणि सर्वात महत्वाचा विषय. व्याप्ती एवढी मोठी कि व्याख्या बनवणे हि अशक्य. आईच्या उदरात जन्माला येणारे हे प्रेम आयुष्याची सोबत करणाऱ्या जोडीदाराच्या सोबतीतून अख्ख जीवन व्यापून ठेवत असतं. प्रेयसी असेल वा अर्धांगिनी; नात्यातून निघालेल्या गुलाबी छटा रंगीत करत असतात आपला प्रवास.
माझ्या लेखणीतून मी असेच काहि शब्द इथे मांडले आहेत. ज्याच्या मदतीने नात्यातील उमंग बहरेल. हे प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार लिहिताना मी स्वतः फार रोमँटिक झालो होतो. आशा आहे. की, वाचक हि हे वाचताना भावविश्वात रमून जातील.
Love Quotes in Marathi – प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार
1)
ती रुसली म्हणून आपण रुसायचं नसतं. अबोल चेहऱ्याला लाडाने मनवायचं असतं.
2)
कधीकधी शब्द अपुरे पडतात; जिथे सुंदर स्मितहास्य सर्व काही मांडून जातात.
3)
जेव्हा जीवनात नैराश्याचे सावट असते. तेव्हा तुझा हसरा चेहरा माझ्या लढण्याची ताकद असते.
4)
जेव्हा अजिंक्य होऊन मी सर्वकाही जिंकत असतो पण तिच्यासमोर होऊन लाचार हृदय मी हारत असतो.
5)
ती वाट संपूच नये. ज्या वाटेवर तुझा हात माझ्या हातात असेल.
6)
माझा सारा ताण हवेत विरतो. जेव्हा मी माझे डोके तुझ्या खांद्यावर ठेवतो.
7)
रुसणे रागावणे प्रेमाचेच कांगोरे आहेत आणि ज्याला मनवणे जमतं तो तृप्त होतो सजनी च्या नखऱ्याने.
8)
मनगटात एवढं बळ नक्कीच असायला हवे; की तुम्हाला प्रेयसीला कवेत उचलून घेता आले पाहिजे.
9)
सर्वात शहाणा तोच असतो असतो. जो चिडलेल्या बायको समोर मुग गिळून गप्प राहतो.
10)
नजरेच्या देवाण-घेवाण शब्द नसतात. पण हीच जगातील महान भाषा आहे.
11)
सुखापेक्षा दुःखाचा भार मोठा असतो. म्हणून जेवढा आनंद जीवनात तिच्या येण्याने येतो. त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त दुःख जीवनातून तिच्या जाण्याने होतो.
12)
मला त्यादिवशी भूख जास्त लागते. ज्यादिवशी ती आणि मी एकाच ताटात जेवत असतो.
13)
खरतर तिला माझ्या कविता नाही आवडत. पण मी तिच्यासाठी कविता बनवतो. हे तिला फार आवडतं.
14)
माझ्या कवितेतील टाकाऊ शब्द टिकाऊ बनतात; जेव्हा ती माझी कविता तिच्या आवाजात रेकॉर्ड करते.
15)
मी तिच्याशी लाडाने कमी आणि भांडून जास्त बोलतो. कारण त्या निमित्ताने तिच्याशी जास्त बोलायला मिळतं.
16)
आम्ही दोघे भांडणानंतर अजून जास्त जवळ येतो कारण आमचं भांडण दूर जाण्यासाठी नव्हे तर जवळ येण्यासाठी असतं
17)
मी कोणावर प्रेम करतो? यापेक्षा माझ्यावर कोण प्रेम करतो? हे जास्त महत्त्वाचं आहे.
18)
प्रेम आणि आकर्षण यामधील फरक ज्याला ओळखता आला तो सुखी झाला.
19)
आदर्श जोडी ती आहे; जिथे जोडीदाराशी तुमची चांगली मैत्री असते.
20)
तिला प्रपोज करणे हे जगातील सर्वात मोठे धाडस.
21)
बाईक चालवण्याची खरी मजा तेव्हा आहे; जेव्हा मागच्या सीटवर तुम्हाला गच्च पकडून बसणारी सोबत असेल.
22)
मला ते जास्त आवडेल; जेव्हा ती मागे न बसता बाईक राईड करेल. आणि मी मागे बसेन.
23)
मला स्वतःला सायकल शिकल्यावर तेवढा आनंद झाला नसेल; जेवढा मला मी तिला सायकल शिकवेन तेव्हा होईल.
24)
माझी डोकेदुखी ही तेव्हा थांबते; जेव्हा मी तूझ्या डोकेदुखी वर तुझे डोके दाबत असतो.
25)
माझ्या आवडत्या खेळांपैकी एक म्हणजे; तिच्या चेहऱ्यावर झुलणारा केसांच्या बटांची खेळणे.
26)
तिचे गाल दुखत असतील पण माझे हात थकत नाहीत तिचे गाल ओढून.
27)
मी प्रत्येक वेळी प्रेमातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रत्येक वेळी तुझी व्याकूळ नजर मला प्रेमात पाडते.
28)
तू मला एवढी का आवडू लागली आहेस? कि तुझं माझ्यावर चिडणं हि मला आवडू लागलंय.
29)
तुला पाहत राहतो तेवढि जास्त सुंदर दिसत जातेस. आणि म्हणून माझी नजर तुझ्यावरून हालत नाही.
30)
माझी सर्वात मोठी परीक्षा मी तेव्हा पास झालो; जेव्हा मी तुला प्रपोज केल्यावर तू लाजत हो बोलली.
आशा आहे कि या love qoutes in marathi तुम्हाला आवडल्या असतील. अभिप्राय नक्की कळवा. काही सूचना असतील तर त्यांचंही स्वागत आहे. लवकरच भेटेन एका नवीन लेखा सह.
धन्यवाद.
Also Read:
खूपच छान
धन्यवाद
Too good and pretty relatable
Thanks