30 Friendship Quotes in Marathi – मैत्री वर मराठी सुविचार

Friendship Quotes in Marathi: माणसाला माणसाशी बांधून ठेवणारे नाते ते मैत्रीचे. त्याची विशेष व्याख्या ती ही काय करावी? मर्यादेच्या बाहेरचं नात हे. क्रिकेटपटू आपल्या बॅटशी मैत्री करतो तेव्हा गोलंदाजांची पळताभुई कमी करतो. फोटोग्राफर आपल्या कॅमेराशी मैत्री करतो तेव्हा आपल्या नजरेला असीमित करतो. गायक सुरांशी मैत्री करतो तेव्हां महान संगीत बनवतो. आणि सैनिक जेव्हा बंदुकीशी मैत्री करतो तेव्हा शत्रू शत्रुत्व घेण्यास हि घाबरतो मैत्रीला शब्दात मांडणे अशक्यच. ती विस्तारते अनुभवातून. तरी अनुभवाचे भाव मी शब्दात मांडायचा प्रयत्न केलाय.

Friendship Quotes in Marathi - मैत्री वर मराठी सुविचार

30 Friendship Quotes in Marathi च्या मथळ्याखालील हा अनुभव जसा माझ्याशी संबंधित आहे; कदाचित तसा हा अनुभव जगमान्य असावा. मैत्रीचे स्वरूप वेगळे असले तरी, मैत्रीची परिभाषा ही सर्वांसाठी सारखी असावी.

 

 Friendship Quotes in Marathi – मैत्री वर मराठी सुविचार

१)Friendship Quotes in Marathi

सर्वश्रेष्ठ मानले जाणारे मातृत्वाचे नाते ही तेव्हा फुलते; जेव्हा माय मुलांची मैत्रीण बनत असते.

२)Friendship Quotes in Marathi

ज्याचा कोणी नसतो त्याचा मित्र असतो.

३)Friendship Quotes in Marathi

शाळेत मित्राचा डबाही हक्काने खाल्लेला असतो. कारण कोणी असो वा नसो. मित्र हक्काचा असतो.

४)Friendship Quotes in Marathi

मित्र बनवणे ही एक कला आहे. अशा कलाकारांना दिलदार समजावे.

५)Friendship Quotes in Marathi

मित्र भरपूर असू शकतात. पण मैत्रीची कसोटी अवघड वेळी लागते.

६)Friendship Quotes in Marathi

इतिहास आपला गौरवशाली आहे. कारण तो बनलाय असंख्य मैत्रीच्या दाखल्यांनी.

७)Friendship Quotes in Marathi

यशस्वी व्यक्तीच्या यशामागे त्याचे मित्र असतात.

८)Friendship Quotes in Marathi

ज्याचा मित्रपरिवार मोठा असतो. त्याच्याशी शत्रुत्व घेण्यात बलाढ्य शत्रू ही कचरत असतो.

९)Friendship Quotes in Marathi

आर्थिक श्रीमंतीने जमवलेले मित्र नावाचे असतात. आणि मनाच्या श्रीमंती ने बनवलेले मित्र कामाचे असतात.

१०)Friendship Quotes in Marathi

मैत्रीचा विषय होता म्हणून ‘शोले’ हा सर्वश्रेष्ठ चित्रपट बनू शकला.

११)Friendship Quotes in Marathi

दारू हे निमित्त असते. मित्रांसोबत मैफिल जी रंगवायची असते.

१२)Friendship Quotes in Marathi

मैत्रीतून फुलणारे प्रेमाचे फुल कायम टवटवीत राहते.

१३)Friendship Quotes in Marathi

फक्त हाय-हॅलो करणारे शेकडो मित्र राखण्यापेक्षा एकच मित्र असा बाळगलेला बरा ज्याला तुमची काळजी असते.

१४)Friendship Quotes in Marathi

दुर्दैवाने सोशल मीडियावर हजारो मित्र ठेवणारे खऱ्या जीवनात एकटे पडलेले आहेत.

१५)Friendship Quotes in Marathi

ज्याला निसर्गाशी मैत्री करता आली त्याला जीवनाचा सार समजला.

१६)Friendship Quotes in Marathi

धावा करून प्रसंगी देव धावून नाही आला तरी देवाप्रमाणे मित्र धावून येत असतात.

१७)Friendship Quotes in Marathi

मैत्रीच्या नात्याला चौकट नसते. ती एका निर्जीव वस्तूवरही होऊ शकते.

१८)Friendship Quotes in Marathi

आठवणींचा ढिगारा उरकून काढला तर पसारा मैत्रीचाच मिळेल.

१९)Friendship Quotes in Marathi

मैदानातील खेळ असतील वा रणांगणातील युद्ध; जिंकले मैत्रीच्या एकीवरच जाते.

२०)Friendship Quotes in Marathi

मित्र वाट दाखवत असतात. वाटेला लावत नसतात. बऱ्याचदा मैत्रीचे सोंग घेऊन शत्रु मित्रत्वाच्या आड लपलेले असतात.

२१)Friendship Quotes in Marathi

मैत्रीचे सोंग घेणाऱ्या मित्रापेक्षा खुलेआम शत्रुत्व घेणारा शत्रू बरा.

२२)Friendship Quotes in Marathi

सख्खा भाऊ मित्रासारखा असेल किंवा नसेल; पण मित्र भावासारखा नक्कीच असतो.

२३)Friendship Quotes in Marathi

मैत्रीचे नाते एवढ्यासाठी श्रेष्ठ की, कोणतेही रक्ताचे नाते नसताना; थेट मनाशी मनाचे बंध भावनांनी जोडलेले असतात.

२४)Friendship Quotes in Marathi

जगात सर्वात जास्त व्याप्ती असणारे नाते हे मैत्रीचे नाते आहे.

२५)Friendship Quotes in Marathi

ज्याचा मित्र नसतो त्याचा कोणीच नसतो.

२६)Friendship Quotes in Marathi

प्रेमाला वय नसते. मैत्रीला तर अजिबातच नसते.

२७)Friendship Quotes in Marathi

आयुष्यातले अर्धे संस्कार मित्रांकडूनच होत असतात.

२८)Friendship Quotes in Marathi

विचारवादी मित्रांची टोळी वैचारिक क्रांती आणू शकते.

२९)Friendship Quotes in Marathi

एक वेळ देव पाण्यात सोडून द्यावा. पण मैत्री कायम जपावी.

३०)Friendship Quotes in Marathi

जवळ विश्वासू मित्र असतील तर आत्मविश्वास आकाशाला शिवत असतो.

मला स्वतःला हे लिहीत असताना माझ्या खास मित्रांची फार आठवण आली. आशा आहे तुम्हाला हि तुमचे मित्र आठवले असतील. तर मग विचार कसला करताय? हा ब्लॉग त्यांना हि पाठवा. आणि अशाच छोट्या छोट्या कृतीतून समृद्ध होऊद्या आपली मैत्री.
या ब्लॉग वर आपल्या प्रतिक्रिया अपेक्षित आहे. आपल्या सूचक मार्गदर्शनाची गरज आहे. इतर नाविन्यपूर्ण लेख लवकरच आपल्यापुढे सादर करू.

धन्यवाद…

Important Posts:

Leave a Comment